Tuesday, February 11, 2014

दुर ...

रोजच्यासारखी सकाळ असावी
नसावे त्यात काही नवे
जुनीच पायवाट असली तरी
चालत त्यावर रहावे

चालता चालता थांबावे थोडेसे
पहावे स्व:तामधे झाकुन
किती जगलो आयुष्य आपण
ठेवलेले आपल्यासाठी राखुन

अस्पष्ट शब्दं विसरले गेले जरी
आठवणी काही राही दाटुन
ह्याच आठवणींनी दाखवुन द्यावे
किती दुर गेलोय आपण एकमेकांपासुन

अनेक रंगांनी सायंकाळी
आसमंतात पसरुन जावे
आठवणींनी तुझ्या नकळत
हसुन ओठांवर यावे

चालता चालता पावले
नकळत घराकडे वळावी
शब्दांना माझ्या अलगद
एक चाल मिळावी

रोज तुझी आठवण यावी
असेही काही नाही
शब्दांत ह्या माझ्या
तु दुरही नाहिस......

--> DEV <--