Saturday, November 20, 2010

aathavan

आठवण

रुतु बदलले तरी
शब्दं कधी बदलत नसतात
अश्रु कितीही आवरले तरी
शब्दं खुप काही बोलुन जातात

वर्तमानात जगता जगता
कधी एक क्षण असाही येतो
ईच्छा नसली तरि
भुतकाळात घेउन जातो
कितीहि गर्दित असलो तरि
एकटा करुन जातो

अशा वेळी डोळ्यातले
अश्रुही मुक होऊन जातात
अन कितीहि आवरले तरि
शब्दं आपोआप मांडले जातात

सगळं काही विसरुन
पुढे चालत राहणं
तेवढं सोप नसतं
तिची आठवण आलेला
दिवस घालवणं खुप कठीण असतं........

-->DEV<--

Wednesday, August 4, 2010

aayusha he asach

आयुष्यं हे असच........

डोळे उघडल्यावर
सुरु होणारा हा प्रवास
संपतो मात्रं
डोळे मिटल्यावर

आजवर अनेकांनी
वर्णने केली
तरी शब्दं कमी
पडले ह्यावर

कधी भर ऊनामधे
चालायचे असते
तर कधी रात्री
चंद्राच्या मंद प्रकाशात

एकट्याने चालायच्या
ह्या वाटेवर लाभते
कधी कधी मित्रं
आणि नातलगांची साथ

स्वत:साठी जगता जगता
कधी दुसऱ्याकडेही
पहायचं असतं

आपल्या अश्रुंनाही
कधी कधी
लपवायचं असतं

आयुष्यं हे आपापलं
प्रत्येकाने ज्याचं त्याचं
जगायचे असतं

आपल्या पश्चात
लोकांनी अश्रु ढाळले तरी
आपण मात्रं हसायचं असतं...........

-->DEV<--

Tuesday, July 20, 2010

kalalech nahi aamhala

कळलेच नाही आम्हाला

आलो आज
इथपर्यंत जरी
गेलेले काही दिवस
कळलेच नाही आम्हाला

निसर्गाला चित्रांमधे
साठवले तरी
फ़ुलांचे रंग कधी
कळलेच नाही आम्हाला


मनातले शब्दं कागदावर
लिहित गेलो तरी
काही शब्दांचे अर्थं
कळलेच नाही आम्हाला


दिसेल त्या वाटेवर
आम्ही चालत राहीलो
कारण आडवाट कधी
सापडलीच नाही आम्हाला

इतरांप्रमाणे जगायला
कधी जमलंच नाही
कारण प्रेम काय असतं
हे कधी कळलंच नाही आम्हाला

-->DEV<--

Saturday, June 12, 2010

shabdanchya palikadale

शब्दांच्या पलीकडले

रोजच्यासारखं विसरुन जावे
असं काही नाही
रोजच तिची आठवण यावी
असेही काही नाही

पण सगळ्याच गोष्टी
आपल्या हातात नसतात
काही गोष्टी नियतीने
ठरवल्यानुसारच होतात

अचानक एके दिवशी आयुष्यं
एक वर्तुळ पुर्ण करते अन
आणुन सोडते पुन्हा त्याच वळणावर
जे काही केलं तरी विसरलं जात नाही

आठवतात ते दिवस
आठवते तिच्याशी अचानक
झालेली ती पहिली भेट
समोर येतो तो
भुतकाळात हरवलेला तिचा चेहरा

अश्या वेळी किती केलं तरी
काहीच बोललं जात नाही
कोऱ्या कागदांवर
शब्दांशिवाय कोणीच बोलत नाही

प्रेम तर सगळेच करतात
फ़रक फ़क्तं एवढाच असतो
काही लोक ते बोलुन दाखवतात
तर काही लोक ते शब्दात मांडतात

काही न बोललेले शब्दं ऎकले जातात
तर काही शब्दं कागदांवरच राहतात
कारण काही गोष्टी नहमीच असतात
शब्दांच्या पलीकडल्या...........

-->DEV<--

Friday, June 4, 2010

Gaarva

उन जरा जास्तं आहे
दरवर्षी वाटतं

भर उन्हात पाउस घेऊन
आभाळ मनात दाटतं

तरी पावलं चालत राहतात
मन चालत नाही

घामाशीवाय शरीरामधे
कोणीच बोलत नाही

तितक्यात कुठुन एक ढग
सुर्यासमोर येतो
उन्हामधला काही भाग
पंखांखाली घेतो

वारा उनाड मुलासारखा सैरावैरा
पळत राहतो
पान, फ़ुलां-झाडां वरती,
छपरावरती चढुन पाहतो

दुपार टळुन संध्याकाळचा
सुरु होतो पुन्हा खेळ

उन्हामागुन चालत येते
गार गार कातरवेळ

चक्कं डोळ्यांसमोर रुतु
कुस बदलुन घेतो
पावसाआधी ढगांमधे
कुठुन गारवा येतो ?

Sunday, March 21, 2010

Man he nehmich

मन हे नेहमीच

कधी हे भर दिवसाही
आकाशात चांदण्या शोधते
तर कधी काळोख्या रात्री
हे सावली शोधत असते

कधी हे खुप पुढचा
विचार करुन येते
तर कधी साध्या, सरळ
गोष्टीतही अडकुन पडते

कधी हे डोक्यातली
गणीते सोडवते
तर कधी ह्रुदयातल्या
तालीवर नाचते

कधी मित्रांच्या गर्दितही
हे एकटेपण शोधते
तर कधी भुतकाळातल्या
आठवणींच्या गर्दित हरवुन जाते

कळले ना कधी कुणाला
ह्याच ठाव ठिकाणा
कारण मन हे नेहमीच
कुणालातरी शोधत असते.......


-->DEV<--

Thursday, March 18, 2010

The Truth

The Truth

There are many things to die for
There are many things to lie for
call is ours
on which side to go for

There's nothing like
right or wrong
its just the matter
of relativity

we remain student
forever in life
what we learn
is the only thing

There are many things
beyond money & Love
Choice is ours
on which side we settle for.


-->DEV<--

Saturday, January 23, 2010

baryach divsanni aaj

बऱ्याच दिवसांनी आज..........

रोजच धुसर वाटणाऱ्या वातावरणात
आज एक वेगळीच नशा जाणवतेय

नेहमी मरगळ असणाऱ्या मनात
आज एक नवीन उमेद जाणवते आहे

कधी नव्हे ते आज
काहीतरी वेगळं करावसं वाटतय

तिरस्कारांच्या शब्दांऎवजी आज अचानक
प्रेमाचे दोन शब्दं ऎकायला येत आहेत

नेहमी बेचव लागणाऱ्या जेवणाला
आज थोडीशी चव लागायला लागलीय

रोज सुनसान असणाऱ्या रस्त्यांवर
आज गर्दि दिसायला लागलीय

अनेकदा दिसणाऱ्या दोन रंगांऎवजी
आज इंद्रधनुष्य दिसु लागलय

बऱ्याच दिवसांनी आज
माणसांत आल्यासारखं वाटतय..........

-->DEV<--