Wednesday, November 23, 2011

आभास हा तुझा

आभास हा तुझा

आठवणीतली एक गोष्टं
मनातल्या कोपऱ्यात राहुन जावी
जणु पहाटेच्या धुंद थंडीत
पायवाट हरवुन जावी

क्षीतीजावरचे रंग कधी
आसमंतात पसरत जावे
आभास तुझा होऊनी
मी स्वत:ला विसरुन जावे

आठवणीत तुझ्या कधी
एकटेच चालत रहावे
तर कधी अर्थ नसतानाही
मनात हळुच हसावे

अघटीत काही गोष्टींनी
मन हे भरुन यावे
आभास तुझा होऊनी
मी क्षणात ते विसरुन जावे

ह्रदयातील शब्दांनी
कधी नकळत बाहेर पडावे
आभास तुझा होऊनी
ते शब्दं आपोआप रचले जावे.....

-->Dev<--

Thursday, June 16, 2011

Chehara - II

चेहरा - II

ओसरणाऱ्या लाटांसारखे
दिवसांमागून दिवस सरतात
जाता जाता स्वत:सोबत
खुप काही घेऊन जातात

कॉलेज मधल्या दिवसातली
स्वप्ने कधीच विरुन जातात
मनातले शब्दं फ़क्तं
कागदांवरच राहुन जातात

पुढच्या आयुष्याची समीकरणे
बदलायची हिच असते खरी वेळ
ईच्छा आकांक्षांचा त्यानंतर
सुरु होतो एक नवीन खेळ

कुठल्यातरी वाटेवर
मन हे चालु लागते
कधी कधी शांत राहुन
खुप काही बोलु पहाते.

काही कळायच्या आतच
खुप काही घडुन जाते
"त्या" चेहऱ्यातुन नियती
आजही खुप काही बोलुन जाते..........

-->DEV<--

Tuesday, April 12, 2011

man he nehmich .... II

मन हे नेहमीच .... २

समुद्रकिनाऱ्यावरच्या एका रम्यं संध्याकाळी
मन हे पक्षी बनुन उडु पहाते
कधी हे वाऱ्यासारखे उनाड फ़िरु पहाते
तर कधी लाटांसोबत खेळु पहाते

कधी हे एखाद्या मास्यासारखे
स्वछंद भटकु पहाते
तर कधी एखाद्या नौकेसारखे
संथपणे विहार करते

कधी हे पॅराशुट बनुन
आकाशाला गवसणी घालु पहाते
तर कधी हे शब्दं बनुन
किनाऱ्याच्या वाळुवर उतरते

सरते शेवटी कितीही
नाही म्हणालो तरी
आजही हे मन कुठेतरी
तिलाच शोधत असते......

-->DEV<--

Wednesday, January 26, 2011

Kavita

कविता

कविता म्हणजे नसतं
नुसतच एक स्वप्नं कुणीतरी पाहिलेलं
ते असतं एक सत्यं
कुणीतरी प्रत्यक्षं अनुभवलेलं

कविता म्हणजे असतो एक प्रकाश
सर्वत्र उजळीत करणारा
कविता म्हणजे असतो एक सागर
अखंडपणे वाहत राहणारा

कविता म्हणजे नसतो
एकट्याने करायचा प्रवास
ती असते एक यात्रा
जिथे लाभतो अनेकांचा सहवास

कविता म्हणजे नसतात
नुसतेच काही शब्दं
त्या असतात मनातल्या भावना
कुणासाठीतरी आजवर जपलेल्या..........

-->DEV<--