Tuesday, February 11, 2014

दुर ...

रोजच्यासारखी सकाळ असावी
नसावे त्यात काही नवे
जुनीच पायवाट असली तरी
चालत त्यावर रहावे

चालता चालता थांबावे थोडेसे
पहावे स्व:तामधे झाकुन
किती जगलो आयुष्य आपण
ठेवलेले आपल्यासाठी राखुन

अस्पष्ट शब्दं विसरले गेले जरी
आठवणी काही राही दाटुन
ह्याच आठवणींनी दाखवुन द्यावे
किती दुर गेलोय आपण एकमेकांपासुन

अनेक रंगांनी सायंकाळी
आसमंतात पसरुन जावे
आठवणींनी तुझ्या नकळत
हसुन ओठांवर यावे

चालता चालता पावले
नकळत घराकडे वळावी
शब्दांना माझ्या अलगद
एक चाल मिळावी

रोज तुझी आठवण यावी
असेही काही नाही
शब्दांत ह्या माझ्या
तु दुरही नाहिस......

--> DEV <--

Wednesday, October 3, 2012

प्रेम म्हणजे .... २


वाटेत कुणी हरवले तरी
चालणे थांबवायचे नसते
दाटुन आले मन हे जरी
ओठांवरील हसु कमी करायचे नसते कधी

दुसऱ्यांच्या आनंदात
कधी तरी आपणही हसावे
शब्दांच्या दुनियेत कधी
आपणही हरवुन जावे

कुणा एकासाठी तरी
पहावे जगुन
आयुष्यात एकदा तरी
प्रेम पहावे करुन


करण्यासाठी प्रेम तर सगळेच करतात
काही लोक ते बोलुन व्यक्तं करतात
तर काही न बोलता
शब्दांतुन कागदावर उतरवतात

ह्यचा अर्थ असा नाही की
बोलणारे शहाणे असतात
शब्दांतुन बोलणारे ही
तेवढेच प्रेम करतात........


-->DEV<--

Wednesday, August 15, 2012

मनात कुठेतरी........






माणसांच्या गर्दीत हरवलेले
कुठेतरी मन माझे
तुला पहिल्यांदा पाहिल्यवर
वाटले आपणही जगावे थोडेसे

नकळत झाली ओळख
नंतर शब्दांशी जरी
दुर तु गेलीस कळल्यावर
ते हरवुन गेले मनात कुठेतरी


भेटणार नाहीस माहित असलं तरी
डोळे तुझीच वाट पाहतात
त्यांमधले अश्रु नकळत
कधी कागदावर उतरतात

जेवढा बाहेर पडायचा प्रयत्न करतो
तेवढाच तुझ्यात गुंतत जातो
सरते शेवटि ह्या चंचल मनाला
हेच समजावतो

आवडलेली प्रत्येक गोष्टं
मिळणं शक्य नसतं
ति नाहि मिळाली तरी
जगणं सोडायच नसतं ....

-->DEV<--

Wednesday, November 23, 2011

आभास हा तुझा

आभास हा तुझा

आठवणीतली एक गोष्टं
मनातल्या कोपऱ्यात राहुन जावी
जणु पहाटेच्या धुंद थंडीत
पायवाट हरवुन जावी

क्षीतीजावरचे रंग कधी
आसमंतात पसरत जावे
आभास तुझा होऊनी
मी स्वत:ला विसरुन जावे

आठवणीत तुझ्या कधी
एकटेच चालत रहावे
तर कधी अर्थ नसतानाही
मनात हळुच हसावे

अघटीत काही गोष्टींनी
मन हे भरुन यावे
आभास तुझा होऊनी
मी क्षणात ते विसरुन जावे

ह्रदयातील शब्दांनी
कधी नकळत बाहेर पडावे
आभास तुझा होऊनी
ते शब्दं आपोआप रचले जावे.....

-->Dev<--

Thursday, June 16, 2011

Chehara - II

चेहरा - II

ओसरणाऱ्या लाटांसारखे
दिवसांमागून दिवस सरतात
जाता जाता स्वत:सोबत
खुप काही घेऊन जातात

कॉलेज मधल्या दिवसातली
स्वप्ने कधीच विरुन जातात
मनातले शब्दं फ़क्तं
कागदांवरच राहुन जातात

पुढच्या आयुष्याची समीकरणे
बदलायची हिच असते खरी वेळ
ईच्छा आकांक्षांचा त्यानंतर
सुरु होतो एक नवीन खेळ

कुठल्यातरी वाटेवर
मन हे चालु लागते
कधी कधी शांत राहुन
खुप काही बोलु पहाते.

काही कळायच्या आतच
खुप काही घडुन जाते
"त्या" चेहऱ्यातुन नियती
आजही खुप काही बोलुन जाते..........

-->DEV<--

Tuesday, April 12, 2011

man he nehmich .... II

मन हे नेहमीच .... २

समुद्रकिनाऱ्यावरच्या एका रम्यं संध्याकाळी
मन हे पक्षी बनुन उडु पहाते
कधी हे वाऱ्यासारखे उनाड फ़िरु पहाते
तर कधी लाटांसोबत खेळु पहाते

कधी हे एखाद्या मास्यासारखे
स्वछंद भटकु पहाते
तर कधी एखाद्या नौकेसारखे
संथपणे विहार करते

कधी हे पॅराशुट बनुन
आकाशाला गवसणी घालु पहाते
तर कधी हे शब्दं बनुन
किनाऱ्याच्या वाळुवर उतरते

सरते शेवटी कितीही
नाही म्हणालो तरी
आजही हे मन कुठेतरी
तिलाच शोधत असते......

-->DEV<--

Wednesday, January 26, 2011

Kavita

कविता

कविता म्हणजे नसतं
नुसतच एक स्वप्नं कुणीतरी पाहिलेलं
ते असतं एक सत्यं
कुणीतरी प्रत्यक्षं अनुभवलेलं

कविता म्हणजे असतो एक प्रकाश
सर्वत्र उजळीत करणारा
कविता म्हणजे असतो एक सागर
अखंडपणे वाहत राहणारा

कविता म्हणजे नसतो
एकट्याने करायचा प्रवास
ती असते एक यात्रा
जिथे लाभतो अनेकांचा सहवास

कविता म्हणजे नसतात
नुसतेच काही शब्दं
त्या असतात मनातल्या भावना
कुणासाठीतरी आजवर जपलेल्या..........

-->DEV<--

Saturday, November 20, 2010

aathavan

आठवण

रुतु बदलले तरी
शब्दं कधी बदलत नसतात
अश्रु कितीही आवरले तरी
शब्दं खुप काही बोलुन जातात

वर्तमानात जगता जगता
कधी एक क्षण असाही येतो
ईच्छा नसली तरि
भुतकाळात घेउन जातो
कितीहि गर्दित असलो तरि
एकटा करुन जातो

अशा वेळी डोळ्यातले
अश्रुही मुक होऊन जातात
अन कितीहि आवरले तरि
शब्दं आपोआप मांडले जातात

सगळं काही विसरुन
पुढे चालत राहणं
तेवढं सोप नसतं
तिची आठवण आलेला
दिवस घालवणं खुप कठीण असतं........

-->DEV<--

Wednesday, August 4, 2010

aayusha he asach

आयुष्यं हे असच........

डोळे उघडल्यावर
सुरु होणारा हा प्रवास
संपतो मात्रं
डोळे मिटल्यावर

आजवर अनेकांनी
वर्णने केली
तरी शब्दं कमी
पडले ह्यावर

कधी भर ऊनामधे
चालायचे असते
तर कधी रात्री
चंद्राच्या मंद प्रकाशात

एकट्याने चालायच्या
ह्या वाटेवर लाभते
कधी कधी मित्रं
आणि नातलगांची साथ

स्वत:साठी जगता जगता
कधी दुसऱ्याकडेही
पहायचं असतं

आपल्या अश्रुंनाही
कधी कधी
लपवायचं असतं

आयुष्यं हे आपापलं
प्रत्येकाने ज्याचं त्याचं
जगायचे असतं

आपल्या पश्चात
लोकांनी अश्रु ढाळले तरी
आपण मात्रं हसायचं असतं...........

-->DEV<--

Tuesday, July 20, 2010

kalalech nahi aamhala

कळलेच नाही आम्हाला

आलो आज
इथपर्यंत जरी
गेलेले काही दिवस
कळलेच नाही आम्हाला

निसर्गाला चित्रांमधे
साठवले तरी
फ़ुलांचे रंग कधी
कळलेच नाही आम्हाला


मनातले शब्दं कागदावर
लिहित गेलो तरी
काही शब्दांचे अर्थं
कळलेच नाही आम्हाला


दिसेल त्या वाटेवर
आम्ही चालत राहीलो
कारण आडवाट कधी
सापडलीच नाही आम्हाला

इतरांप्रमाणे जगायला
कधी जमलंच नाही
कारण प्रेम काय असतं
हे कधी कळलंच नाही आम्हाला

-->DEV<--

Saturday, June 12, 2010

shabdanchya palikadale

शब्दांच्या पलीकडले

रोजच्यासारखं विसरुन जावे
असं काही नाही
रोजच तिची आठवण यावी
असेही काही नाही

पण सगळ्याच गोष्टी
आपल्या हातात नसतात
काही गोष्टी नियतीने
ठरवल्यानुसारच होतात

अचानक एके दिवशी आयुष्यं
एक वर्तुळ पुर्ण करते अन
आणुन सोडते पुन्हा त्याच वळणावर
जे काही केलं तरी विसरलं जात नाही

आठवतात ते दिवस
आठवते तिच्याशी अचानक
झालेली ती पहिली भेट
समोर येतो तो
भुतकाळात हरवलेला तिचा चेहरा

अश्या वेळी किती केलं तरी
काहीच बोललं जात नाही
कोऱ्या कागदांवर
शब्दांशिवाय कोणीच बोलत नाही

प्रेम तर सगळेच करतात
फ़रक फ़क्तं एवढाच असतो
काही लोक ते बोलुन दाखवतात
तर काही लोक ते शब्दात मांडतात

काही न बोललेले शब्दं ऎकले जातात
तर काही शब्दं कागदांवरच राहतात
कारण काही गोष्टी नहमीच असतात
शब्दांच्या पलीकडल्या...........

-->DEV<--

Friday, June 4, 2010

Gaarva

उन जरा जास्तं आहे
दरवर्षी वाटतं

भर उन्हात पाउस घेऊन
आभाळ मनात दाटतं

तरी पावलं चालत राहतात
मन चालत नाही

घामाशीवाय शरीरामधे
कोणीच बोलत नाही

तितक्यात कुठुन एक ढग
सुर्यासमोर येतो
उन्हामधला काही भाग
पंखांखाली घेतो

वारा उनाड मुलासारखा सैरावैरा
पळत राहतो
पान, फ़ुलां-झाडां वरती,
छपरावरती चढुन पाहतो

दुपार टळुन संध्याकाळचा
सुरु होतो पुन्हा खेळ

उन्हामागुन चालत येते
गार गार कातरवेळ

चक्कं डोळ्यांसमोर रुतु
कुस बदलुन घेतो
पावसाआधी ढगांमधे
कुठुन गारवा येतो ?

Sunday, March 21, 2010

Man he nehmich

मन हे नेहमीच

कधी हे भर दिवसाही
आकाशात चांदण्या शोधते
तर कधी काळोख्या रात्री
हे सावली शोधत असते

कधी हे खुप पुढचा
विचार करुन येते
तर कधी साध्या, सरळ
गोष्टीतही अडकुन पडते

कधी हे डोक्यातली
गणीते सोडवते
तर कधी ह्रुदयातल्या
तालीवर नाचते

कधी मित्रांच्या गर्दितही
हे एकटेपण शोधते
तर कधी भुतकाळातल्या
आठवणींच्या गर्दित हरवुन जाते

कळले ना कधी कुणाला
ह्याच ठाव ठिकाणा
कारण मन हे नेहमीच
कुणालातरी शोधत असते.......


-->DEV<--

Thursday, March 18, 2010

The Truth

The Truth

There are many things to die for
There are many things to lie for
call is ours
on which side to go for

There's nothing like
right or wrong
its just the matter
of relativity

we remain student
forever in life
what we learn
is the only thing

There are many things
beyond money & Love
Choice is ours
on which side we settle for.


-->DEV<--

Saturday, January 23, 2010

baryach divsanni aaj

बऱ्याच दिवसांनी आज..........

रोजच धुसर वाटणाऱ्या वातावरणात
आज एक वेगळीच नशा जाणवतेय

नेहमी मरगळ असणाऱ्या मनात
आज एक नवीन उमेद जाणवते आहे

कधी नव्हे ते आज
काहीतरी वेगळं करावसं वाटतय

तिरस्कारांच्या शब्दांऎवजी आज अचानक
प्रेमाचे दोन शब्दं ऎकायला येत आहेत

नेहमी बेचव लागणाऱ्या जेवणाला
आज थोडीशी चव लागायला लागलीय

रोज सुनसान असणाऱ्या रस्त्यांवर
आज गर्दि दिसायला लागलीय

अनेकदा दिसणाऱ्या दोन रंगांऎवजी
आज इंद्रधनुष्य दिसु लागलय

बऱ्याच दिवसांनी आज
माणसांत आल्यासारखं वाटतय..........

-->DEV<--

Wednesday, December 16, 2009

garaj aahe ti fakta

गरज आहे ती फ़क्तं............

येईल एक असाही दिवस
दाटुन येईल मन जुन्या आठवणींनी

बोलावेसे वाटेल खुप काही
पण ते ऎकायला कुणीही नसेल

जावसं वाटेल बघायला
पण बरोबर येणारं कुणीही नसेल

हसावसं वाटेल जोक ऎकुन
पण तो जोक सांगणारं कुणीही नसेल

जावसं वाटेल CCD मध्ये
पण सोबत कॉफ़ी प्यायला कुणीही नसेल

जावसं वाटेल जवळच्या मॉलमध्ये
पण सोबत Shopping करायला कुणीही नसेल

ह्याचा अर्थं असाही नाही
कि आता काहिच शक्य नाही

गरज आहे ती फ़क्तं एका समजुतदार मनाची
एका दिवसासाठी थोड्याश्या Adjustment ची.

-->DEV<--

Wednesday, November 4, 2009

Ekada tari

एकदा तरी.............

रोज रोज तेच करण्यात काय मजा
एकदा तरी वेगळे काही केले पाहिजे

स्वत:साठी सगळेच जगतात
दुसऱ्यासाठी जगण्यातली मजा वेगळीच असते

जिंकण्यासाठी प्रत्येक जण खेळतो
एकदा तरी हारण्य़ासाठी खेळावे

रोज रात्री स्वप्ने बघण्यात काय मजा
एकदा तरी भर दिवसा स्वप्न पहावे

दुसऱ्याची चुक दाखवणे खुप सोपे असते
एकदा तरी स्वत:च्या चुकीवर विचार करावा

आपल्या माणसांच्या आनंदाचा विचार कुणीही करेल
एकदा तरी दुसऱ्याच्या स्मितहास्यासाठी प्रयत्न करावा

प्रवाहाच्या ओघात प्रत्येक जण चालतो
एकदा तरी विरुध दिशेला चालुन पहावे

रोज रोज अपेक्षांच्या हवेत उडण्यापेक्षा
एकदा तरी वास्तवाच्या जमिनीवर चालुन पहावे

रोज रोज तेच आयुष्यं प्रत्येक जण जगतो
एकदा तरी मरुन पहावे............

-->DEV<--

Wednesday, October 21, 2009

maze thode aikun ghyaa

माझे थोडे ऐकुन घ्या.........

काय करावे, काय बोलावे
काहीच सुचत नाही

ओठांवरचे शब्दं अन डोळ्यातले अश्रु
बाहेर पडतच नाही

झाले कधी हे सुरु
तेही आता आठवत नाही

कसलीच अपेक्षा न ठेवता
आलेला दिवस घालवतो आहे

शांत राहुन सर्व काही
निमुटपणे सहन करत आहे

नाही होत मला आनंद
असे वागुन तुम्हाला त्रास देऊन

तुम्हाला दुखी पाहुन
मी ही तेवढाच आतुन मरत आहे

नसलो जरि तुमच्या आसपास
ह्या मनात आहे फ़क्तं तुमचाच वास

आहे फ़क्तं आता एकच इच्छा
मी न बोललेले शब्दं ऐकुन घ्या.........

-->DEV<--

Sunday, September 27, 2009

rahayache aahe machine banun

रहायचे आहे मशीन बनुन........

होते फ़क्तं एकच स्वप्नं
एका जीवन साथीदाराचं

होता ध्यास एका नवीन पर्वाचा
वेगळे काही करायचा

घडली काय अशी ती चुक
बदलले जिने सर्वच विश्वं

दोष तो काय अन कुणाला द्यायचा
परिस्थितिला कि स्वत:ला

वाटते नकोच ते सारे
जे नव्हतेच कधि

वाटते रहावे असेच मशीन बनुन
नसतील जिकडे आशा अपेक्षा
नसतील जिकडे भांडणतंटे
नसतील जिकडे रुसवे फ़ुगवे

नसतील जिकडे इंद्रधनुष्यं
असतिल फ़क्तं दोनच रंग
नसेल जिथे आसवांचा पाझर
असेल फ़क्तं इंधनाचा वापर

जगायचे आहे असेच जीवन
रहायचे आहे मशीन बनुन..........

-->DEV<--

Sunday, September 13, 2009

aayusha mhanje kaay asata

आयुष्यं म्हणजे काय असतं.........

आयुष्यं म्हणजे असतो एक प्रवास
जो सुरु होतो,
आपल्या जन्मापासुन
न कदाचित
मरणानंतरही संपत नाही.

अनेक उन्हाळे-पावसाळे
पहायला मिळतात या प्रवासात.
काही सुखाचे क्षण
अनुभवायला मिळतात,
तर काही कायमचा
धडा शिकवुन जातात

काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात
तर काही जाणुन बुजुन
पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने
अर्धवटच राहुन जातात

अशा ह्या प्रवासाच्या पुस्तकात
काही पाने नकळत जोडली जातात
तर काही कोरीच राहुन जातात....
आणि मग शेवटी ह्या कोऱ्या
कागदांचे तयार होते एक वेगळेच पुस्तक
ज्याला आपण नाव देतो "माझे आयुष्यं".

-->DEV<--