Friday, June 4, 2010

Gaarva

उन जरा जास्तं आहे
दरवर्षी वाटतं

भर उन्हात पाउस घेऊन
आभाळ मनात दाटतं

तरी पावलं चालत राहतात
मन चालत नाही

घामाशीवाय शरीरामधे
कोणीच बोलत नाही

तितक्यात कुठुन एक ढग
सुर्यासमोर येतो
उन्हामधला काही भाग
पंखांखाली घेतो

वारा उनाड मुलासारखा सैरावैरा
पळत राहतो
पान, फ़ुलां-झाडां वरती,
छपरावरती चढुन पाहतो

दुपार टळुन संध्याकाळचा
सुरु होतो पुन्हा खेळ

उन्हामागुन चालत येते
गार गार कातरवेळ

चक्कं डोळ्यांसमोर रुतु
कुस बदलुन घेतो
पावसाआधी ढगांमधे
कुठुन गारवा येतो ?

3 comments:

 1. All credit to Original POET !!!!!!!!!!

  ReplyDelete
 2. चक्कं डोळ्यांसमोर रुतु
  कुस बदलुन घेतो
  पावसाआधी ढगांमधे
  कुठुन गारवा येतो ?

  ----------Prajakta

  ReplyDelete