एक चेहरा....
दिवसांमागून दिवस जातात
महिन्यांगून महिने........
वाटते गेल्या आठवड्यातच
कॉलेज चालू झाले.......
पण कॅलेंडरमध्ये बघितल्यावर
कळते तो आठवडा
दोन महिन्यांपूर्वीच गेला..........
दिवसभर लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स,
असाईनमेंट्स यामध्ये कधी
वेळ जातो कळतच नाही.......
मग घरी जाताना नेहमीचेच ते
कॅटिनमध्ये खाणे किंवा
कधी कधी प्रिंट्स......
घरी आल्यावर दोन मिनिटेही
बसवत नाही की
लगेच झोप लागते......
मग दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच
अनेक चेहरे रोज दिसतात
काही ओळखीचे तर काही अनोळखी..
अचानक एका चेह्ऱ्यावर नजर जाते
आणि मग तो चेहरा कायमचा मनात
घर करून जातो
नंतर असा एक दिवस जात
नाही की ज्या दिवशी
तो चेहरा आठवत नाही
घरी आल्यावर निवांतपणे
बसून तो चेहरा आठवून
विचार करावा तर कळते........
८ दिवसांवर परीक्षा आहेत........
आज मागे बघितल्यावर आठवते
खुप काही करायचे राहून गेले
जे काही आजपर्यंत मिळवले
त्यापेक्षा खुप काही गमावले
पण या सगळ्यात तो चेहरा
अजूनही विसरलेलो नाही
कदाचित विसरु शकतही नाही
पण जेव्हा जेव्हा
तो चेहरा आठवतो
तेव्हा एक गोष्ट
मनात पक्की होते की
आपल्याला खुप काही
साध्य करायचे आहे...............
--> DEV <--
Sunday, August 30, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
Thats my 1st Composition
ReplyDeleteDt's 2 good...
ReplyDeleteekdum flashback madhe jaun aale...