Sunday, August 30, 2009

shevatache shabda maze

शेवटचे शब्द माझे..........

खुप अभ्यास करुन झाला
आता थोडे काम करेन म्हणतो

आजवर खुप काही गमावले
आज थोडे काही कमावेन म्हणतो

मनात आले जरी खुप हसु
तरी आज शेवटचे रडेन म्हणतो

दुसऱ्यासाठी खुप जगलो
आज स्वत:साठी जगेन म्हणतो

काही सुचेनासे झाले तरी
आज शेवटचे शब्द लिहीन म्हणतो

अत्तापर्यंत नेहमी दूसराच राहीलो
आज पहिला येईन म्हणतो

अत्तापर्यंत देवाकडे नेहमी
दुसऱ्यासाठीच मागीतले
आज स्वत:साठी
काही तरी मागेन म्हणतो

ही शेवटची कविता लिहीन म्हणतो
तिच्या आयुष्यातुन निघुन जाईन म्हणतो.............

--> DEV <--

No comments:

Post a Comment